अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे.
मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली.
आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी सदस्य संजय ढोणे, सचिन जाधव, सतीष शिंदे, अजय चितळे आदी उपस्थित होते. कोरोनावरील लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे.
त्यामुळे एकाच केंद्रांवर गर्दी होणार नाही. लसींचे डोस सर्व केंद्रांना सम प्रमाणात वाटप केल्यास सर्व प्रभागांतील नागरिकांना लस देणे शक्य होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होण्यासाठी उपाययोजनाची खरी गरज आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे.
त्यामुळे शहरातील बालरोगतज्ज्ञांची टास्क फोर्स समिती स्थापन करावी. जेणेकरून बालकांवर उपचार करणे सोपे होईल, अशी भूमिका आरोग्य समितीने मांडली.