अहमदनगर जिल्ह्यातील घटना : तीन लहान मुलींचा आधार असलेल्या बापाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-श्रीगोंदा नगरपालिकेच्या टपाल विभागात कार्यरत असणारे लिपिक मोरेश्वर जगन्नाथ ससाने यांनी काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत माहिती मिळाली आहे. श्रीगोंदा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म समोर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा नगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत असणारे मोरेश्वर ससाने यांना काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास असल्याबाबत समजते आहे.

४४ वर्षीय ससाने यांनी धावत्या रेल्वे मालगाडीसमोर उडी घेत आत्महत्या करण्यापूर्वी ते श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवर बराच वेळ निवांत बसल्याचे स्टेशन मास्टरने सांगितले. रेल्वे स्टेशनवर नमूद मालगाडी प्रवेश करीत असतांना स्टेशन मास्टरने ससाणे यांना मागे होण्यासाठी आवाज देऊन सावध केले.

तोपर्यंत ससाणे यांनी गाडी खाली उडी घेतली. गाडी थांवण्यासाठी मोटरमनने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र, गाडी थांबण्यापूर्वीच मोरेश्वर ससाणे रेल्वेच्या चपेटमध्ये आले होते. पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.

या घटनेबाबत स्थानिक शरद सुपेकर यांनी श्रीगोंद्यातील नगरपालिका कर्मचारी व नगरसेवक यांच्याशी संपर्क केला. व घटनेची माहिती दिली. यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक अख्तर भाई शेख, कर्मचारी बाप्पू जाधव व सुभाष माने (बारकू) यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी नमूद ठिकाणी पाहणी केली व घटनेचा अंदाज घेत स्टेशन मास्टर यांच्याशी वार्तालाप केल्याबाबत सुभाष माने यांनी माध्यमांना सांगितले.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचे शव विच्छेदन करून अंत्यविधीसाठी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मोरेश्वर ससाने यांच्या पश्चात त्यांच्या तीन लहान मुली आहेत. मोठी मुलगी आठवीत आहे.

आई, वडील, बहीण मयत, असून, त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झालेला असल्याने घरातील कर्ते व कुटुंब प्रमुख म्हणून ते त्यांच्या मुलींचा सांभाळ करत होते. या मुलींचे वडील रुपी छत्र नमूद दुर्घटनेत हिरावल्याने परिसरामध्ये दुःख व्यक्त केले जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24