विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू या तालुक्यातील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  आज माणसाचे जगण्यापेक्षा मरण अधिक स्वस्त झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.

तालुक्यातील खांबे येथील एका तरुणाचा विहिरीतील वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नितीन बापू भोंडे असे त्या तरुणाचे नाव होते, ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील नेहारवाडी खांबे येथील नितीन बापू भोंडे (वय ३७) हा तरुण ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक पाणी पुरवठा करण्याच्या विहिरीतील वीज पंपाची केबल काढत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला.

यावेळी ग्रामस्थांनी त्याला विहिरीबाहेर काढले व संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24