अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-एका तरूणास काहीएक कारण नसताना काठीन बेदम मारहाण करून पाचजणांनी त्याला विषारी औषध पाजून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेतील आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे,
ही घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे राहणारा तरुण गोरख बाबासाहेब शिंगटे (वय २४) याला पाचजणांनी बाभुळगाव शिवारातील काटवनाचे लवण येथे धरुन लाथाबुक्याने व काठीने बेदम मारहाण केली.
तसेच त्याच्या तोंडात बळजबरीने कसले तरी विषारी औषध पाजून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गोरख शिंगटे या तरुणाने कर्जत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोेलिसांनी राजेंद्र पोपट कसाब, विजय पोपट कसाब( दोघेही रा.माही ता.कर्जत),
रोहित ज्ञानदेव फुकटे, लंका ज्ञानदेब फुकटे (दोघेही रा.जळगाव, ता.कर्जत), शिलावती पोपट कसाब (रा.माही) यांच्याविरुद्ध कर्जत पोलिसात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत अधिक तपास पोलिस निरिक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मोरे हे करीत आहेत.