अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढच आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. शहापूर तालुक्यात बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला.
त्यावेळी ताे १३ वर्षांच्या मुलीला साेबत घेऊन मेंगाळपाडा येथे राहायला आला, तर सहा वर्षांची मुलगी आपल्या आईसाेबत राहिली. त्याच्यासाेबत राहणाऱ्या मुलीला धमकावून ताे तिच्यावर सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत हाेता.
या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर मुलीच्या पोटातील गर्भ पाडून आराेपीने विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले.
पिडीतेच्या आईला याबद्दल समजलं. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याबाबत विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत सारा प्रकार सांगितला.
मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.