Healthy Heart : सध्याच्या धावपळीच्याआयुष्यात ह्रदयविकाराचा झटका येण्याची समस्या सामान्य बनली आहे. अनेकांना कमी वयातच ह्रदयविकाराचा झटका येत आहे. हृदय शरीराला रक्तासोबत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम करते.
अनियमित खाणे, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन, व्यायाम न करणे, तसेच शारीरिक हालचाली कमी असणं यांसारख्या कारणांमुळं हृदयाचे विकार होतात. परंतु, तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता. जर तुम्ही आहारात काही सुपरफूड्सचा समावेश केला तर तुम्ही या समस्येपासून वाचू शकता.
आहारात करा या पदार्थांचा समावेश
1. संपूर्ण धान्याचा करा आहारात समावेश
परिष्कृत धान्यांच्या विपरीत, संपूर्ण धान्य आपल्या शरीरासाठी आणि खासकरून हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. कारण या संपूर्ण धान्य हृदयाला सामान्य झीज होण्यापासून वाचवते.
2. डार्क चॉकलेट खावे
तुम्ही नॉर्मल चॉकलेट खातच असाल, पण जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही आतापासूनच डार्क चॉकलेट खायला सुरुवात करा. अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेली ही गोष्ट खाल्ल्याने तुमचे शरीर आणि हृदय आजूबाजूला असणाऱ्या विषारी पदार्थांपासून सुरक्षित ठेवते. डार्क चॉकलेटमध्ये हृदयाचे कार्य सुधारणारे महत्त्वाचे खनिजे असतात.
3. फॅटी फिश
सॅल्मन आणि ट्यूनासारखे फॅटी मासे हे प्रथिने आणि निरोगी चरबीचे समृद्ध स्रोत आहेत. शरीराला वेगवगेळ्या कार्यांसाठी प्रथिनांची खूप गरज असते. यासह, निरोगी चरबी आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास आणि आवश्यक जीवनसत्त्वे शोषण्यास मदत करत असतात.
4. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑईल आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. इतर स्वयंपाकाच्या तेलांमुळे रोग होण्याचा धोका वाढू शकतो तर ऑलिव्ह ऑइल ते कमी करण्यास मदत करू शकते. जे लोक त्यांच्या रोजच्या आहारात ऑलिव्ह ऑइल वापरतात त्यांच्या हृदयाचे आरोग्य सुधारले जाते.