संगमनेर शहरातील दोन बड्या उद्योग समुहांवर प्राप्तीकर विभागाची कारवाई!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जमिन खरेदी विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या संगमनेर शहरातील दोन बड्या उद्योग समुहांवर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे.

या थेट कारवाईमुळे मात्र शहरातील जमीन खरेदी विक्री करणारे एजंट चांगलेच धास्तावले आहेत. प्राप्तीकरच्या छाप्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील त्या दोन उद्योग समुहाच्या मुख्य कार्यालयात प्राप्तिकर विभागाकडून अत्यंत सविस्तर चौकशी केली जात असल्याने या प्रकरणाची चौका चौकात चर्चा केली जात असून,विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संबंधित उद्योग समुहाची गुंतवणूक मागील काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायातही मोठ्या प्रमाणात झाल्याने प्राप्तीकर विभागाची ही कारवाई आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

संबंधीत उद्योग समुहाच्या त्या संचालकांची सध्या शहरातील बांधकाम व्यवसायीक आणि प्लॉट खरेदी विक्री करणार्‍या एजंटामध्ये चांगलीच वर्दळ असल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. आता ही कारवाई नेमकी कशासाठी केली हे समजण्यास सध्या तरी कोणीच सांगण्यास तयार नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24