Income tax notice : सावधान! तुम्हालाही आली असेल अशी आयकर नोटीस तर जाणून घ्या नाहीतर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income tax notice : व्यवसाय करणारे असो किंवा गलेगठ्ठ पगार असणारी व्यक्ती असो, त्यांना दरवर्षी आयकर हा भरावाच लागतो. जर त्यांनी आयकर भरला नाही तर त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. तरीही काहीजण वेळोवेळी सूचना देऊनही आयकर भरत नाहीत.

नुकतेच आयकर विभागाने कर भरणाऱ्या सर्व करदात्यांना वेळेपूर्वी कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच अनेक कर भरत असणाऱ्या नागरिकांना आयकर विभागाकडून एक नोटीस बजावण्यात आली आहे. जर तुम्हालाही अशी नोटीस आली असेल तर त्याकडे नीट लक्ष द्या,

खरं तर कोणालाही आयकर विभागाकडून नोटीस मिळणे ही चांगली बाब नाही, परंतु, जर तुम्हाला नोटीस मिळाली असेल तर घाबरून जाऊ नका. आयकर विभाग हा वेगवगेळ्या कारणांसाठी करदात्यांना नोटिसा पाठवत असतो.अनेकांचा असा समज असतो की आयकर रिटर्न भरले की आपले काम झाले. परंतु आयकर रिटर्न भरल्यानंतरही नोटीस येऊ शकते.

यात भरलेला कर आणि करपात्र उत्पन्न यामध्ये तफावत असेल तर विभागाकडून नोटीस मिळते. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये मोठ्या प्रमाणात रिफंडचा दावा करणे हे एक महत्त्वाचे नोटीसचे कारण बनते. हे लक्षात ठेवा की नोटीसची श्रेणी ही नोटीस कोणाला पाठवली जात आहे त्यानुसार ठरते. यात एकूण 15 ते 20 प्रकारच्या नोटिसा आहेत.

कलम 142: समजा जर एखाद्या व्यक्तीने आयटीआर भरला नाही, तर आयकर अधिकारी त्यांना आता कलम 142 अंतर्गत नोटीस देऊन आयटीआर भरा असे सांगू शकतात. या कलमांतर्गत किरकोळ माहिती किंवा खुलासा मागण्यासाठी नोटिसाही पाठवण्यात येतात.

कलम 143 (2): आयकर विभागाची ही एक छाननीची नोटीस असून याचा अर्थ असा आहे की आयकर विभागाला तुमच्याकडून आणखी काही तपशीलवार माहिती पाहिजे आहे. या अंतर्गत अकाउंट्स बुक, बँक स्टेटमेंट यांसारखी अनेक माहिती मागवली जाते. या आधारे त्याचे मूल्यांकन करण्यात येईल. इन्कम टॅक्स रिटर्न भरले की अनेकांना अशी नोटीस येते.

कलम 144: यालाच बेस्ट जजमेंट असेसमेंट असेही म्हणतात. जर तुम्ही आयटीआर दाखल केला नसल्यास किंवा 142 किंवा 143 (2) अंतर्गत जारी केलेल्या नोटीसला प्रतिसाद दिला नाही, तर आयकर अधिकारी कलम-144 अंतर्गत नोटीस पाठवण्यात येते. अधिकाऱ्यांना आता विद्यमान माहितीच्या आधारे उत्पन्नाचे मूल्यांकन करून त्यावर कर, व्याज आणि दंड आकारता येतो.

कलम 147/148/149: जर आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला असे वाटले की तुमच्या उत्पन्नाच्या पूर्वीच्या मूल्यांकनात काही उत्पन्न यांचा तुम्ही समावेश केला नाही किंवा तुमचे असे कोणतेही उत्पन्न आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही माहिती दिली नाही किंवा उघड केले गेले नाही, तर अशी नोटीस येते.

कलम 143(1): समजा जर तुम्ही कोणती चूक केली असल्यास किंवा ITR मध्ये चुकीची माहिती दिली असल्यास तेव्हा या अंतर्गत सूचना आयकर विभागाकडून देण्यात येते. अशा स्थितीत प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावून तुमची बाजू विचारली जाऊ शकते.

इतकेच नाही तर हे लक्षात ठेवा की, सदोष परताव्यासाठी कलम 139(9), शोध आणि जप्तीसाठी कलम 153(A), कर, व्याज किंवा दंडाच्या थकबाकीसाठी कलम 156, उत्पन्न लपवल्याच्या संशयासाठी कलम 131(A) अंतर्गत नोटिसा तुम्हाला पाठवण्यात येऊ शकतात.