ताज्या बातम्या

केंद्रीय सुरक्षाधारी नेत्यांमध्ये वाढ, आता या भाजप आमदाराला सुरक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यातील भाजपचे नेते किंवा भाजपशी संबंधित नेत्यांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरविण्याची पद्धत पडत असून या नेत्यांच्या यादीत वाढच होत आहे.

आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही केंदीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘सीआयएसएफ’ या सुरक्षा यंत्रणेमार्फत पडळकर यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

आमदार पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका करीत असतात. पडळकर यांच्यावर यापूर्वी काही वेळा हल्लेही झाले आहेत.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. त्यांना राज्य सरकारने सुरक्षा दिली नव्हती, त्यामुळे आता थेट केंद्राकडूनच त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.

आतापर्यंत अशा प्रकारची सुरक्षा राज्यातील अनेक भाजप नेत्यांना देण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या, खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा तसेच सिने अभिनेत्री कंगना राणावत यांचा यामध्ये समावेश आहे.

या सर्वांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेतल्याने ते चर्चेत आले आहेत. यातील काहींवर राज्य सरकारने कारवाईही केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office