पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज वाढ केली आहे. मागील दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच आज चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 31-39 पैसे आणि डिझेल 15-21 पैसे प्रति लिटरपर्यंत महागले आहे.

या दरवाढीनंतर आता देशभरातील इंधनांचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत.आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर 101.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

तर मुंबईत पेट्रोल 107.54 रुपये आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लिटर दराने विकण्यात येत आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 101.35 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.23 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आजचे पेट्रोलचे दर – ₹ 107.17 पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल? पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे.

हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

अहमदनगर लाईव्ह 24