अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-नगर तालुक्यात कोरोनाने कहर सुरू केला असुन दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .
तालुका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत तालुक्यात कोवीड सेंटरची संख्या वाढवावी अशी मागणी नगर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले .
बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे , उपसभापती संतोष म्हस्के , माजी सभापती हरिभाऊ कर्डिले , माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसिलदार अभिजीत बारवकर यांची भेट घेऊन त्यांना कोरोना उपयोजनांबाबत चर्चा केली .
याबाबत सभापती घिगे म्हणाले की , नगर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन प्रशासनाच्या उपाययोजना कमकुवत ठरत आहेत . शहरातील जिल्हा रुग्णालय व बुथ हॉस्पीटल कोरोना रूग्णांनी हाऊसफुल झाले आहेत .
खासगी दवाखान्यातील खर्च तालुक्यातील गोरगरीबांना परवडत नाही . यामुळे प्रशासनाने प्रत्येक गावात रॅपिड टेस्ट शिबीराचे आयोजन करून बुऱ्हाणनगर ,चास , जेऊर , देहरे , वाळकी , रूई ,
अरणगाव आदि ठिकाणी तालुक्यातील रूग्णांसाठी कोवीड सेंटर सुरू करावेत . तेथे व्हेंटींलेटरची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली . यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे , अनिल करांडे, बबन आव्हाड उपस्थीत होते .