ताज्या बातम्या

Health Tips : अशाप्रकारे वाढवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती, नाहीतर वाढू शकतो कोरोनाचा धोका?

Published by
Ahmednagarlive24 Office

Health Tips : आपल्या शरीरात अनेक जिवाणू आणि विषाणू असतून त्यापैकी काही जिवाणू आणि विषाणू फायदेशीर असतात. तर काही खूप घातक असतात. त्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असते.

त्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होतात. सध्या कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते त्यांना कोरोना होण्याची शक्यता असते असे अभ्यासात आढळून आले आहे.

सकस आहार घ्या

शरीर निरोगी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आहारात फळे,भाज्या, प्रथिनेयुक्त पदार्थ, संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करावा.

तसेच सॅच्युरेटेड फॅट, कोलेस्ट्रॉल, मीठ आणि साखरेचे सेवन जास्त प्रमाणात करू नका. कारण निरोगी आहार घेतल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

व्यायाम आणि योग आवश्यक

आहारासोबतच नियमित योगा आणि व्यायाम करावा. त्यामुळे चांगली झोप आणि तणाव दूर होऊ शकतो. तसेच हार्मोन्स संतुलित करणे, वजन नियंत्रित करेन, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि रोगांचा धोका कमी होतो.

धूम्रपान आणि मद्यपान टाळावे

आरोग्यासाठी धूम्रपान आणि मद्यपान खूप हानिकारक असते. त्यामुळे शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता कमकुवत होते. तसेच धुम्रपानामुळे संधिवात, फुफ्फुसाच्या आजारांसोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मद्यपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे अशा लोकांना इतर आजार धोका जास्त असतो.

पुरेशी झोप महत्वाची 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी चांगली झोप घेणे खूप गरजेची आहे. पुरेशी झोप न घेणाऱ्या व्यक्तींना मानसिक आजारांसोबतच हृदयविकारआणि रक्तदाबाचा धोका अधिक असतो. त्यासाठी दररोज 6ते 8 तासांची झोप घ्या.

Ahmednagarlive24 Office