अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार २३८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ८९१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०० आणि अँटीजेन चाचणीत ३४३ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा ०४, अकोले १०, जामखेड ०९, कर्जत ०४, नगर ग्रा. १५, पारनेर ९७, पाथर्डी ४५, राहुरी ०३, संगमनेर २७, श्रीगोंदा २९, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या

तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ११, जामखेड २७, कर्जत १९, कोपरगाव ०८, नगर ग्रा.०८, नेवासा १६, पारनेर १३, पाथर्डी ०१, राहता ११, राहुरी ०१, संगमनेर २१, शेवगाव ३६, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४३ जण बाधित आढळुन आले. मनपा १४, अकोले १५, जामखेड १९, कर्जत ५८, कोपरगाव १४, नगर ग्रा. ०९, नेवासा १३, पारनेर ४८, पाथर्डी ४२, राहता ०७, राहुरी ०८, संगमनेर १८, शेवगाव १२, श्रीगोंदा ५५, श्रीरामपूर ०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले १५, जामखेड १३, कर्जत १५, कोपरगाव १३, नगर ग्रा. ४२, नेवासा २४, पारनेर ५५, पाथर्डी ५२, राहता ४३, राहुरी १०, संगमनेर ४२, शेवगाव ५२, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,८१,२३८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३८९१
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:६०९०
  • एकूण रूग्ण संख्या:२,९१,२१९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
अहमदनगर लाईव्ह 24