मुसळधार पावसामुळे मुळा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ; धरण 80 टक्के भरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने दोन दिवसांत मुळा धरणात मुबलक पाणी आल्याने 26000 दलघफू क्षमतेचे हे धरण 80 टक्के भरले.

तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास हे धरण 100 टक्के भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या धरणातील पाणीसाठा 20800 दलघफूटावर पोहचला होता. हरिश्चंद्र गड, आंबित, कोतूळ, आणि पारनेरात पाऊस होत असल्याने दोन दिवसांत या धरणात तब्बल 1200 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 467 दलघफू पाणी दाखल झाले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 20670 दलघफू झाला होता. त्यानंतरही आवक सुरू असल्याने पाणीसाठा 20800 दलघफू झाला.

दरम्यान पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे धारण क्षेत्रातील पाण्यातही चढउतार होत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगडावर मागील काही दिवसांमध्ये दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात नवीन पाणीसाठा जमा होत आहे.