विद्यमान लोकप्रतिनिधी राडीचा डाव खळत आहे! माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- प्रशासनाला हाताशी धरून मतदार याद्यामध्ये छेडछाड करण्यात आली असून, याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.विद्यमान आमदाराच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने त्यांनी राजकीय सुडापोटी कुटील दबावाच्या,

राजकारणातून त्रासदायक चित्र निर्माण केले असल्याचा घणाघात माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. कर्जत नगरपंचायतसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

यानंतर माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, कर्जत नगरपंचायतसाठी भारतीय जनता पार्टीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

यामध्ये सतरा प्रभागातील ६३ इच्छुकांनी आपली नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या काळात राज्याच्या तिजोरीतून १५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करू शकलो.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मनापासून प्रमाणिक प्रयत्न केला.

या उलट गेल्या दोन वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीत केलेली आश्‍वासनांची खैरात आणि दाखवलेल्या खोटया स्वप्नाची पूर्तता न झाल्याने सध्या जनतेत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांत त्यांना कर्जत शहरासाठी कुठलेही भरीव काम करता आले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्या पासून ते रडीचा डाव खेळत आहेत हे कर्जतच्या जनतेला कळले आहे.

राजकीय इर्षेला पेटुन सुडाच्या व कुटील दबावाच्या, राजकारणातून त्रासदायक चित्र निर्माण केले, हे सर्व जनतेने पाहिलेच आहे. परंतु एवढे होऊनही विजयाची खात्री नसल्या कारणाने व पराभव समोर दिसत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वार्ड नुसार मतदार याद्यात छेडछाड करण्यात आली आहे. असा आरोप त्यांनी केला.

Ahmednagarlive24 Office