ताज्या बातम्या

IND vs SL: श्रीलंकेच्या अडचणीत वाढ ! भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार गोलंदाज ; निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

Published by
Ahmednagarlive24 Office

IND vs SL Odi Series:   भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकामध्ये 2-1 ने विजय प्राप्त केला आहे. आता दोन्ही संघांमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका 10 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक खुषखबरी आली आहे.

तर दुसरीकडे श्रीलंकेच्या अडचणीत वाढ होणार आहे याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय संघात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात पुनरागमन होणार आहे. तो काही काळ दुखापतीमुळे टीम इंडियाचा भाग नव्हता.  2023 मधील टीम इंडियाची ही पहिली एकदिवसीय मालिका असेल. या मालिकेसाठी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहने टीम इंडियासाठी शेवटचा सामना सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, तर त्याने 14 जुलै 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

दुखापतीमुळे होता बाहेर 

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. या स्पर्धांमध्ये संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासत होती. जसप्रीत बुमराह सध्या भारतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराह भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 30 टेस्ट मॅचमध्ये 128 विकेट्स, 72 एकदिवसीय मॅचमध्ये 121 विकेट्स आणि 60 टी-20 मॅचमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

हे पण वाचा :-   Smartphone Offers : पुन्हा संधी मिळणार नाही ! ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन मिळत आहे 22 हजारांनी स्वस्त ; पहा संपूर्ण ऑफर

Ahmednagarlive24 Office