भारताचा चीनला दणका ! तब्बल ५४ चीनी अ‍ॅप्स केले बॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- भारत सरकारने आणखी ५४ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश आहे. यापैकी बरेच अ‍ॅप्स हे टेंसेंट, अलीबाबा आणि गेमिंग कंपनी नेटइज सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत.

रिपोर्टनुसार नव्या बंदी घालण्यात आलेल्या यादीत सर्वाधिक क्लोन करण्यात आलेली अ‍ॅप्स आहेत. यात २०२० पासून बंदी घालण्यात आलेली अ‍ॅप्सही आहेत. तसंच ५० आणखी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली असून एकूण बंदी घातलेल्या अ‍ॅप्सची संख्या ही ३२० पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

पहिल्या वेळेसभारत सरकारने 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली, ज्यामध्ये Tiktok, Shareit, WeChat, Helo, Like, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन्सचा समावेश होता.

बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा – सेल्फी कॅमेरा, गॅरेना फ्री फायर – इल्युमिनेट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनम्योजी अरेना, अ‍ॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार हे अ‍ॅप्स प्लेस्टोरवरून हटवण्यात येत आहेत. पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते.

त्यानंतर २९ जून २०२० मध्ये चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. भारताच्या या कारवाईने चीनला चांगलाच दणका बसला होता. चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला होता.