काल विश्वचषक 2023 चा अंतिम सामना झाला अन क्रिकेटचा हॅन्गओहर उतरला. विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षक जमले होते. प्रत्येक जण सामना पाहत होता. दुपारच्यावेळी रस्त्यावर असणारी गर्दी कमी झालेली दिसत होती.
परंतु ही मॅच भारताने हरली अन सर्वच क्रिकेटप्रेमी दुःखाच्या छायेत गेले. अनेक चाहत्यांचा व क्रिकेटप्रेमींचे रडतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. परंतु हा सामना जरी भारताने हरला असला तरी दुसरीकडे या सामान्यामुळे अनेक कंपन्या करोडपती झाल्या. भारतातील अनेक कंपन्यांनी एकाच दिवसात करोडोंची कमाई केली. चला यावर टाकुयात एक नजर..
डिज्नी+हॉटस्टार कंपनी मालामाल
डिस्ने + हॉटस्टारबद्दल आता कुणाला वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही. काल झालेल्या अंतिम सामन्यात ओटीटीचे सर्व विक्रम डिज्नी+हॉटस्टारने मोडीत काढले असे म्हणणे देखील वावगे ठरू नये. मॅच असल्याने या अॅपवर 5.9 कोटी युजर लाईव्ह असल्याचे दिसत होते. म्हणजेच या आकड्यांनी एक मोठा इतिहास रचला.
या सर्व गोष्टींमुळे डिस्ने + हॉटस्टारच्या पॅरेण्ट कंपनीचे शेअर्स देखील प्रचंडन वाढले. त्यामुळे गुंतवणूकदार देखील मालामाल झाले. पहिल्या सामना जेव्हा सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किमतीत 19 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच व्हॅल्युएशन 2.2 लाख कोटी रुपयांची वाढले.
फूड ऑर्डर आणि Zepto ची लाखोंची कमाई
क्रिकेट सामन्याचा फूड डिलिव्हरी कंपनी झेप्टोला प्रचंड फायदा झाला. काल या कंपनीला रेकॉर्डब्रेक ऑर्डर मिळाल्या. तुम्हाला विशेष वाटेल या कंपनीस एका दिवसात चार ते पाच लाख रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या.
म्हणजे सणासुदीच्या काळात देखील इतक्या ऑर्डर या कंपनीस मिळत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ऑर्डर काल एका दिवसात कंपनीस मिळाल्या. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चिप्स आणि आइस्क्रीमला जास्त मागणी यादिवशी होती. एकंदरीतच Zepto ने या दिवशी भरपूर कमाई केली.
हॉटेल सेक्टरवर देखील पैशांचा पाऊस
वर्ल्डकप सुरु झाला तेव्हापासून काल पर्यंत हॉटेल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भरपूर कमाई केली. हे सेक्टर अगदी मालामाल झाले. संपूर्ण विश्वचषकमधील सामने हे देशातील मोठ्या 10 शहरांमध्ये आयोजित केलेले होते. त्यामुळे हॉटेल क्षेत्रानेही बक्कळ पैसा कमवला. या क्षेत्रांव्यतिरिक्त अनेक क्षेत्र आहेत की जे या काळामध्ये मालामाल झाले. त्यामुळे वर्ल्डकप जरी भारताने गमावला असला तरी अनेक सेक्टर भरपूर मालामाल झाले आहेत.