ताज्या बातम्या

India News Today : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 31 वर्षांची तुरुंगवास; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Published by
Renuka Pawar

India News Today : उद-दावा या दहशतवादी संघटनेचा (terrorist organization Ud-Dawa)  प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) याला पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने (Anti-terrorism court) 31 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.

हाफिज सईदला यापूर्वीच पाच टेरर फंडिंग प्रकरणात (Terror funding case) 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिजला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्यासाठी 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवले आहे.

हे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, हाफिज सईदला यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये 11 वर्षांची आणि नोव्हेंबर 2020 मध्ये 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हाफिज आणि इतरांविरुद्ध पाकिस्तानच्या सीआयडीने हे गुन्हे दाखल केले आहेत. हाफिज सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा (Mumbai attack mastermind) मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता.

2017 मध्ये, हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते, परंतु पंजाबच्या न्यायिक पुनरावलोकन मंडळाने त्यांची तुरुंगवास वाढवण्यास नकार दिल्यानंतर सुमारे 11 महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप होत असताना पाकिस्तानच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. FATF यादीत पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये आहे. पाकिस्तान काळ्या यादीत आल्यास पाकिस्तानचा जागतिक निधी थांबेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar