T20 World Cup : टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघ (Indian team) पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
याआधी दोन सराव सामने (warm-up matches) खेळवले जाणार आहेत. त्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयसीसीने (ICC) सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी (Australia) तर दुसरा सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियासोबत सराव सामने खेळून टीम इंडियाची तयारी सुधारेल.
आयसीसीने या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व 16 संघांसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत खेळणारे संघ मेलबर्नमध्ये आपली तयारी सुरू करतील. सर्व सामने 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि जंक्शन ओव्हल येथे खेळवले जातील.
त्याचवेळी, सुपर 12 मध्ये खेळणारे संघ 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी त्यांचे सराव सामने खेळतील. हे दोन्ही सामने गाब्बा आणि अॅलन बॉर्डर मैदानावर होणार आहेत. भारतीय संघ 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
वेस्ट इंडिज आणि UAE मधील पहिला सराव सामना
पहिला सराव सामना 10 ऑक्टोबर रोजी जंक्शन ओव्हल येथे वेस्ट इंडिज आणि यूएई संघादरम्यान खेळवला जाईल. यानंतर स्कॉलंडचा सामना नेदरलँडशी होणार असून श्रीलंकेचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. तिन्ही सामने एकाच मैदानावर एकाच दिवशी होणार आहेत.
स्पर्धेचे यजमान आणि गतविजेते ऑस्ट्रेलिया 17 ऑक्टोबर रोजी गाबा येथे त्यांचा एकमेव सराव सामना खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. या मैदानावर टीम इंडिया दोन दिवसांनी न्यूझीलंडशी भिडणार आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना नामिबियाशी होणार आहे. हा सामना जिलॉन्ग येथील कार्डिनिया पार्क स्टेडियमवर होणार आहे.
T20 विश्वचषकासाठी भारताचे वेळापत्रक
16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. भारत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह सुपर 12 मध्ये आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे.
पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध, 27 ऑक्टोबर रोजी अ गटातील उपविजेत्यासह दुसरा, 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा, त्यानंतर चौथा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशशी आणि पाचवा सामना 6 नोव्हेंबर रोजी गट ब विजेत्यासह होईल.