अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून शास्त्री यांच्यासह चार जणांना आयसोलेट केलं आहे. यामध्ये गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचा समावेश आहे..
आज सकाळी या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली असून सध्या ते हॉटेलमध्ये आहेत. वैद्यकीय पथकाच्या पुढील सूचनेपर्यंत त्यांना संघासोबत प्रवास करता येणार नाही’,
असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच भारतीय संघातील अन्य सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या असून त्यात सर्वांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.