Indian Idol: पवनदीप इंडियन आयडलचा विजेता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  अखेर बहुचर्चित अश्या इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता घोषित करण्यात आला आहे. पवनदीप राजननं इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल १२’चा ग्रॅण्ड फिनाले अखेर पार पडला आहे. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर पवनदीप राजनने ‘इंडियन आयडल १२’ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

ग्रॅण्ड फिनालेमध्ये पवनदीप राजनेन इतर स्पर्धकांना दमदार टक्कर दिली आहे आणि तो विजेता ठरला आहे. इंडियन आयडल १२’च्या ट्रॉफीसोबतच पवनदीपला लक्झरी कार आणि २५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहेत. ‘इंडियन आयडल ११’चा फिनाले पार पडला. यंदाचा फिनाने तब्बल १२ तास चालला.

या १२ तासात अनेक गेस्टनी उपस्थितीने लावली आणि य़ा गेस्टसोबत स्पर्धकांनी धमाल केली. यंदाच्या ‘इंडियन आयडल १२’ मध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. मोठ्या संघर्षानंतर ६ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले होते.

पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखाप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल आणि सायली कांबळे या स्पर्धकांमध्ये फिनालेची चुरस रंगली. या स्पर्धेत विजेते न ठरलेल्या इतर स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने देखील अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

जज सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्यासह आज इंडियन आयडल 12 चा 12 तासांचा ग्रेट ग्रँड फिनाले रंगला.चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली.जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी ग्रेट ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही दिलेत.

या शोच्या माजी स्पर्धकांनीही एकापाठोपाठ एक दमदार परफॉर्मन्स दिले. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स दिले. प्रत्येकजण गात असताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले़ सुखविंदर सिंह यांना मोहम्मद दानिशसोबत ‘लगन लागी’ हे गाणे सादर केले़ हिमेश रेशमियाने निहालसोबत परफॉर्म दिला.

हिमेशने २ सर्वप्रथम ‘चलाओं ना नॅनो से बाण रें’ हे गाणं गायले. तर निहालने ‘तेरा चेहरा’ हे गाणं गायले. अल्का याग्निक आणि पवनदीप राजन यांची जुगलबंदीही यावेळी पाहायला मिळाली.

‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं सादर करत त्यांनी सर्वांची मने जिंकली.मिका सिंगने प्रथम सर्व महिला स्पर्धकांसोबत, नंतर पुरुष स्पर्धकांसोबत परफॉर्मन्स दिले आणि शेवटी त्याने सर्वांसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला.

अहमदनगर लाईव्ह 24