Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Indian Railway : जेलमध्ये जाण्याची तयारी असेल तरच रेल्वेच्या या डब्यातून करा प्रवास

जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. नाहीतर तुम्हालाही विनाकारण जेलची हवा खावी लागू शकते. इतकेच नाही तर तुम्हाला दंडाची रक्कमही भरावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Indian Railway : तुमच्यापैकी अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतील किंवा जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्याकडे प्रवासासाठी तिकीट खूप महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला दंड आणि तुरुंगात जावे लागू शकते.

दरम्यान रेल्वेचे असेही काही नियम आहेत ज्यांची माहिती दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नसते. अनेकांकडून हे नियम नकळत मोडले जातात. जरी नकळत नियम मोडले तरीही त्यांना शिक्षा भोगावी लागते.

जर तुम्ही चुकून पँट्री कारने प्रवास केला तर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि तुरुंगातही जावे लागेल. काय सांगतो रेल्वेचा हा नियम जाणून घ्या. जर तुमचा कधी रेल्वेच्या प्रवासाचा संबंध आला असेल, तर तुम्हाला पॅन्ट्री कारची ओळख असणारच. ज्यांचा प्रवास लांबचा असतो अशा गाड्यांमध्ये पॅंट्री कार बसवण्यात येते. यात तुम्हाला इन्स्टंट फूड दिले जाते. याच पॅन्ट्री कारमध्ये स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात येते.

तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागणार

रेल्वेमध्येही असा डब्बा असतो. ज्यातून जर तुम्ही चुकून प्रवास केला तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. पँट्री कार अशी या कोचची ओळख आहे. जर तुम्ही पॅंट्री कारमधून प्रवास केला तर तुम्हाला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेच्या नियमानुसार किंवा रेल्वे कायद्यानुसार कोणत्याही प्रवाशाला रेल्वेच्या पॅंट्री कारमधून प्रवास करता येत नाही. जर असे करताना कोणी सापडले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. तसेच गरम दूध, पाणी अशा कोणत्याही विशेष ऑर्डरसाठी तुम्हाला पॅन्ट्री कारमध्ये जाता येते. मात्र त्यातून प्रवास करण्याची परवानगी तुम्हाला नसते.

हे पदार्थ मिळतात

रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पॅन्ट्री कारमध्ये स्टँडर्ड कॅसरोल जेवण, बिर्याणी आणि सार्वजनिक खाद्यपदार्थ बनवले जाते. स्टँडर्ड कॅसरोल मीलमध्ये व्हेज कॅसरोल मील, एग कॅसरोल मील आणि चिकन कॅसरोल मीलचा पर्याय आहे. तसेच बिर्याणीमध्ये व्हेज बिर्याणी, एग बिर्याणी आणि चिकन बिर्याणीचा समावेश असतो. सार्वजनिक खाद्यपदार्थात पुरी, भाजी आणि लोणची देण्यात येतात. इतकेच नाही तर रेडीमेड चहाही दिला जातो.

कसे असते स्टँडर्ड व्हेज?

दरम्यान प्रमाणित शाकाहारी जेवणात 150 ग्रॅम साधा भात असून तो अॅल्युमिनियमच्या कॅसरोलमध्ये पॅक केले जाते. यासोबत दोन पराठे किंवा चार रोट्या रॅपरमध्ये पॅक केल्या जातात. ज्याचे वजन 100 ग्रॅमपेक्षा कमी नसते. यासोबतच 150 ग्रॅम जाड मसूरही कॅसरोलमध्ये पॅक करणे गरजेचे असून 100 ग्रॅम हंगामी भाज्यांचाही समावेश असतो. तसेच यात एक ग्लास 80 ग्रॅम दही आणि 12 ग्रॅम लोणचेही देण्यात येते. ज्या ट्रेमध्ये हे अन्न दिले जाते त्यात रुमाल आणि एक डिस्पोजेबल चमचा असतो.