Indian Railway : रेल्वेच्या डब्यावर पिवळे, पांढरे आणि लाल रंगाच्या पट्ट्या का असतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण
लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर बातमी तुमच्या खूप कामाची आहे.
Indian Railway : भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे. जर तुम्हाला प्रवासाचा खरा आनंद घ्यायचा असेल तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. अशातच काही सुविधा या प्रवाशांना माहीतच नसतात.
तर काही नियम हे प्रवाशांना माहिती नसतात त्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तुम्ही अनेकदा रेल्वेच्या डब्यावर पिवळे, पांढरे आणि लाल रंगाच्या पट्ट्या पाहिल्या असतील. अनेकांना या पट्ट्या का असतात? असा सवाल पडत असतो. जर तुम्हालाही असा सवाल प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे.
देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांवर वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. त्यांचा अर्थ अनेकांना माहिती नसतात. सध्या भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी अनेक पावले उचलत आहेत.
लाल आणि निळ्या डब्यांवर पिवळा पट्टा
रेल्वेच्या निळ्या आणि लाल डब्यांवर पिवळे पट्टे रंगवण्यात येतात. शारीरिकदृष्ट्या विकलांग प्रवाशांसाठी हे डबे तयार केले आहेत.
निळ्या डब्यांवर पांढरा पट्टा
विशिष्ट रेल्वेचे बिगर आरक्षित द्वितीय श्रेणीचे डबे दर्शविण्यासाठी निळ्या रंगाच्या रेल्वे डब्यांवर पांढरे पट्टे दिले असतात. या पट्ट्यांच्या मदतीने प्रवाशांना सामान्य डबे सहज ओळखता येतात.
राखाडी डब्यांवर हिरव्या पट्टे
जर रेल्वेच्या राखाडी रंगाच्या डब्यावर हिरव्या पट्ट्या दिसले तर याचा अर्थ असा की ते खास महिलांसाठी राखीव आहे.
ग्रोथ कोचवर लाल पट्टे
राखाडी डब्यांवर लाल पट्टे असले तर ते हे सूचित करतात की हे EMU/MEMU रेल्वेमधील प्रथम श्रेणीचे डबे आहेत.