Indian Railway : तुम्हालाही रेल्वेमध्ये मिळू शकते मोफत जेवण, जाणून घ्या हा नियम
रेल्वेला उशिर झाला तर आयआरसीटीसी तुम्हाला अनेक सेवा मोफत देते, जाणून घेऊया सविस्तर माहिती त्याबद्दल....
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी-सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसी आपल्या प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगपासून ते फूड डिलिव्हरी आणि इतर गोष्टींसाठी सुविधा प्रदान करत असते.
तर दुसरीकडे, रेल्वेला उशीर झाला तर तुम्हाला अनेक मोफत सुविधाही देण्यात येतात. समजा जर भविष्यात कधीतरी रेल्वेला उशीर झाला तर प्रवासी म्हणून तुम्हाला काही अधिकार आहेत. रेल्वेला उशीर झाला तर आयआरसीटीसी तुम्हाला जेवण मोफत देत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया….
काय मिळणार मोफत ?
खरं तर, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल, तर प्रवाशांना IRCTC कडून मोफत जेवण, पाणी आणि शीतपेय देण्यात येऊ शकते. सर्वात म्हणजे हे सर्व मोफत असेल म्हणजेच प्रवाशांना यासाठी एक रुपय्याही खर्च करावा लागणार नाही.
कोणाला होणार फायदा?
जर तुम्ही अशा ट्रेनमध्ये चढत आहात जी उशीराने धावत आहे, तर अशा परिस्थितीत IRCTC कडून ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण देण्यात येते. भारतीय रेल्वेच्या मतानुसार, रेल्वेला उशीर झाला तर, प्रवाशांना IRCTC च्या खानपान धोरणानुसार नाश्ता आणि हलके जेवण देण्यात येते.
या गोष्टी मिळणार मोफत
- रेल्वेच्या नाश्त्यात चहा-कॉफी आणि बिस्किटे दिली जाते.
- चहा किंवा कॉफी, 4 ब्रेड स्लाइस (तपकिरी/पांढरे) आणि 1 बटर चिपोटल संध्याकाळच्या स्नॅकसाठी देण्यात येते.
- दुपारी प्रवाशांना डाळ-रोटी, भाजी वगैरे दिली जाते.
तर तुम्हाला मिळेल मोफत जेवण
हे मोफत जेवण कधी कधी मिळू शकतं हे जाणून घ्या. IRCTC च्या नियमांनुसार, तुमची रेल्वे 2 तास किंवा त्याहून अधिक उशीर झाला तर, तुम्हाला मोफत जेवण दिले जाते. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येतो.