Indian Railways: रेल्वेने (Railways) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेची ( Indian Railways) ऑनलाइन तिकीट बुकिंग करणारी संस्था IRCTC ने ऑनलाइन तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. तुम्ही आगामी काळात रेल्वे तिकीट बुक (Railways Ticket Booking) करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
IRCTC ने वेरिफिकेशन अनिवार्य केला आहे
बदललेल्या नवीन नियमानुसार, आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाइटवरून तिकीट बुक करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमचे खाते Verify करावे लागेल, त्यानंतरच तिकीट बुकिंग होईल. याशिवाय, एका युजर आयडीवर एका महिन्यात जास्तीत जास्त तिकीट बुक करण्याची मर्यादा आता IRCTC ने 12 वरून 24 केली आहे.
वेरिफिकेशन केल्याशिवाय तिकीट बुक केले जाणार नाही
आयआरसीटीसीच्या नवीन नियमांनुसार, आता युजर्सला तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी Verify करणे आवश्यक असेल. ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर Verify केल्याशिवाय तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक करू शकणार नाही.
वेरिफिकेशन कसं होणार जाणून घ्या
मेल आणि मोबाइल नंबर Verify करण्यासाठी, IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर जा आणि Verify विंडोवर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल आणि Verify करा वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा आणि मोबाईल नंबर Verify करा. मोबाईल क्रमांकाची वेरिफिकेशन करण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाईल तीच प्रक्रिया मेल वेरिफिकेशनमध्येही वापरली जाईल. या वेरिफिकेशन नंतर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.