Indian Railways : भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेच्या दररोज हजारो गाड्या धावत असतात. या रेल्वे गाड्यांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे सर्वात जास्त भारतीयांचे आर्थिक जीवन हे रेल्वेवर अवलंबून आहे.
जरी लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असले तरीही रेल्वेच्या बाबत काही रंजक गोष्टी अनेकांना माहिती नसतात. अनेकदा तुम्ही रेल्वेच्या डब्यांवर X आणि LV अशी अक्षरे पाहिली असतील. परंतु ही अक्षरे काय आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? खरंतर याच अक्षरांमुळे तुमचा जीव वाचतो. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जाणून घ्या X आणि LV चा अर्थ
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मतानुसार, जर रेल्वेमध्ये LV हे कॅपिटल अक्षरात लिहिलेले असल्यास त्याचा अर्थ असा आहे की रेल्वेचा शेवटचा डबा किंवा शेवटची रेल्वे असा होऊ शकतो. तसेच X म्हणजे हा डबा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही अक्षरे पिवळ्या रंगात किंवा पांढऱ्या रंगात लिहिण्यात येतात. सुरक्षेसाठी रेल्वेच्या शेवटी लिहिलेजाते जे पाहून स्टेशन मास्टरला समजते की संपूर्ण रेल्वे निघून गेली आहे.
खूण नसेल तर..
जर रेल्वेच्या डब्याच्या मागे ही खूण नसल्यास तर स्टेशन मास्टर ती रेल्वे थांबवू शकतो, कारण याचा अर्थ असा होतो की एक डबा मागे राहिला असून या स्थितीत लगेच संदेश पाठवण्यात येऊन रेल्वेच्या या डब्याचा नंबर शोधण्यात येतो. या रेल्वेद्वारे सर्व गाड्यांची सुरक्षा निश्चित करण्यात येते. या चिन्हाच्या अनुपस्थितीमुळे, रेल्वेला धावण्याची परवानगी मिळत नाही.