Indian States Name : भारत देश हा 29 घटक राज्ये तसेच 7 केंद्रशासित प्रदेश मिळून तयार झाला आहे. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु काहीजणांना अनेक राज्यांची नावे माहिती नाहीत.
मात्र भारतातील या राज्यांची नावे कशी पडली? या नावांचा उदय कोठून झाला? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही असाच गमतीशीर प्रश्न पडला असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज या राज्यांची नवे कशी पडली ते जाणून घेणार आहोत.
पूर्व भारत:
ओडिशा- ओडरा या समाजाच्या नावावरून ओडिशा राज्याचे नाव पडले असून ते मध्य भारतातील रहिवासी होते.
बिहार- बिहार हे नाव पाली भाषेतून आले असून यालाच पूर्वी विहार असे म्हटले जात होते. बौद्ध धर्मात विहार याचा अर्थ म्हणजे मठ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिहारच्या भूमीवरच गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती.
झारखंड – झारखंड याचा अर्थ पाहायचा झाला तर झाड म्हणजे जंगल, झाडे आणि वनस्पती आणि खांड म्हणजे पृथ्वीचा एक तुकडा. कमी होत असणाऱ्या जंगलांमध्ये या राज्याचा मोठा भाग जंगलाचा असल्याने या राज्याचे नाव झारखंड असे पडले आहे.
पश्चिम बंगाल – बंगा जमातीच्या नावावरून या राज्याचे नाव पडले आहे. नंतर याला बंग, वांग असे म्हणण्यात आले. ब्रिटिश राजवटीत त्याचे बंगाल असे नामकरण केले.
मध्य भारत:
मध्य प्रदेश – मध्य प्रदेश हे सेंट्रल प्रोव्हिन्सचे हिंदी भाषांतर असून ब्रिटीश काळात या भागाला ब्रिटीश राजवटीत सेंट्रल प्रोव्हिन्स असे म्हटले जाते.
छत्तीसगड – येथे असणाऱ्या ३६ किल्ल्यांच्या नावावरून छत्तीसगड असे या राज्याचे नाव पडले आहे. या ठिकाणाचे नाव अगोदर ‘दक्षिणा कौशल’ होते ज्याचा महाभारतातही उल्लेख करण्यात आला आहे.
पश्चिम भारत:
गुजरात – ८ व्या शतकात या ठिकाणी राज्य करणाऱ्या गुज्जर समाजाच्या नावावरून या राज्याचे नाव पडले गेले आहे.
महाराष्ट्र- महाराष्ट्राचे नाव महा आणि राष्ट्र मिळून बनले गेले आहे, हा शब्द राष्ट्रिका नावाच्या जमातीपासून तयार झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशोकाच्या शिलालेखातही याचा उल्लेख केला आहे.
गोवा- महाभारतात गोव्याचे वर्णन गोपराष्ट्र म्हणजेच गोपालकांचा देश असे करण्यात आले आहे. संस्कृतच्या इतर अनेक स्त्रोतांमध्ये गोव्याचा उल्लेख गोपकपुरी, गोपकपट्टन या नावाने केला आहे. इतकेच नाही तर याचे पुरावे स्कंद पुराण आणि हरिवंश पुराणातही आढळतात.
ईशान्य:
मणिपूर – मणिपूरच्या चमकदार दगडांवरून या राज्याचे नाव पडले असून असे म्हटले जाते की एकेकाळी मौल्यवान चमकदार दगड येथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सापडले होते.
मेघालय- मेघालय हे ईशान्येतील एक सुंदर राज्य असून ज्यात इतर राज्यांपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे याला ढगांचे घर असेही म्हणतात.
त्रिपुरा- राजा त्रिपुराच्या नावावरून या राज्याचे नाव पडले असून अनेक लोकांचा असा विश्वास आहे की त्रिपुरा हा शब्द कोकबोरोक भाषेतील ताई आणि पॅरा या दोन शब्दांपासून तयार झाला आहे, यातील ताई म्हणजे पाणी आणि पॅरा म्हणजे पास होय.
अरुणाचल प्रदेश – अरुण + अचल दोन शब्दांनी हा शब्द बनला आहे.अरुण म्हणजे सूर्य आणि अचल म्हणजे पर्वत, म्हणजेच उगवत्या सूर्याचा पर्वत होय.
सिक्कीम- सिक्कीम हा शब्द तिबेटी भाषेतील डॅनझोंग या शब्दापासून तयार झाला असून हा शब्द लिंबू मूळच्या ‘सू’ आणि खय्याम या दोन शब्दांपासून बनला आहे, यातील सु म्हणजे ‘नवीन’ आणि खय्यामचा ‘महाल’ म्हणजे नवीन राजवाडा होय.
आसाम – आसाम राज्याचे नाव अहोम या शब्दावरून पडले असून 600 वर्षांपूर्वी अहोम राजवंश या प्रदेशावर राज्य करत होता.
मिझोरम – Mi म्हणजे लोक आणि Jo म्हणजे टेकडी.
नागालँड- नागालँड हे मूळतः नागा जमातीचे निवासस्थान असून जे पूर्वी नागा हिल्स टुएनसांग म्हणून ओळखण्यात येते.
उत्तर भारत:
उत्तराखंड- पूर्वीचे उत्तरांचल हे नाव उत्तरेकडील स्थानामुळे पडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे राज्य उत्तर प्रदेशातून तयार झाले आहे.
दिल्ली – सात वेळा नष्ट होऊन सात वेळा स्थायिक झाले.दिल्लीबाबत असे म्हटले जाते की इसवी सन पूर्व ५० मध्ये या प्रदेशावर मौर्य राजांचे राज्य होते. तसेच घराण्यातील राजा धिल्लू, ज्याला दिलू असेही म्हटले जाते, त्याचे नाव त्याच्या नावावर आहे.
उत्तर प्रदेश- देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्ट्या उत्तरेला स्थित असल्यामुळे या राज्याचे नाव उत्तर प्रदेश असे पडले आहे.
पंजाब – या राज्याचे नाव पर्शियन भाषेतील दोन शब्द (पंज + आब) जोडून ठेवले आहे. पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे नदी.या कृषीप्रधान राज्यात पाच प्रमुख नद्या असून ज्यांची नावे झेलम, सतलज, रवी बियास आणि चिनाब अशी आहेत.
हिमाचल प्रदेश – या ठिकाणी हिम म्हणजे बर्फ आणि अचल म्हणजे बर्फाळ पर्वतांचे घर होय. हिमालयाच्या जवळ आहे त्यामुळे येथील बहुतेक पर्वत बर्फाच्छादित आहेत.
जम्मू-काश्मीर- ‘के’ आणि ‘शिमीर’ या दोन शब्दांच्या संयोगातून काश्मीर असे नाव पडले आहे, ‘के’ म्हणजे पाणी आणि ‘शिमीर’ म्हणजे कोरडे होणे. जम्मूचे नाव तेथील शासक, राजा जम्बू लोचन यांच्या नावावर आहे.
राजस्थान- या ठिकाणी वर्षानुवर्षे राज्य करत असणाऱ्या राजपूत समाजाच्या नावावरून या राज्याचे नाव पडले आहे.
हरियाणा – हरियाणा राज्याचे नाव हरी आणि अयान या दोन शब्दांच्या समोर आले आहे, हरी म्हणजे विष्णू आणि अयान म्हणजे निवासस्थान होय. महाभारताचे युद्ध सध्याच्या हरियाणा राज्यातच झाले असल्याचे हे सर्वज्ञात आहे.
दक्षिण भारत:
आंध्र प्रदेश- आंध्र म्हणजे दक्षिण तसेच राज्याचे ठिकाण, या राज्याचे नाव आंध्र या प्रादेशिक शब्दावरून दक्षिण प्रदेशच्या नावावर ठेवले आहे.
केरळ – केरळचे नाव मल्याळम शब्द ‘केरा’ वरून आले असून ज्याचा अर्थ नारळ असा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केरळ हे देशातील सर्वात मोठे नारळ उत्पादक राज्य आहे.
तेलंगणा- देशातील सर्वात नवीन राज्य तेलंगणाचे नाव ‘त्रिलिंग’ या शब्दावरून आले असून या शब्दाचा अर्थ तीन शिवलिंगांची भूमी असा आहे.
कर्नाटक- हे नाव कन्नड भाषेतील करू आणि नाडू या दोन शब्दांच्या संयोगातून पडले असून यात करू म्हणजे उच्च किंवा काला आणि नाडू म्हणजे स्थान होय.
तमिळनाडू – या राज्याचे नाव तामिळ भाषेतील तामिळ शब्दावरून पडले असून नाडू म्हणजे राहण्याचे ठिकाण, याचाच अर्थ असा की तामिळ समाजातील लोक राहत असणारी जागा. तर दुसरीकडे, अनेक लोक म्हणतात की तमिळ म्हणजे फुलांचा गोड रस आणि नाडूचे ठिकाण, हा गोड रस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे त्यामुळे या राज्याचे नाव तामिळनाडू असे पडले आहे.