अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- 93 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. मात्र बुधवारी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने जारी केलेल्या आणि पुढील फेरीसाठी निवडल्या गेलेल्या 15 सिनेमांच्या यादीत ‘जल्लीकट्टू’ आपले स्थान कायम ठेवू शकला नाही.
ऑस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेले सिनेमे जल्लीकट्टू शिवाय शंकुतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोंसले, गुलाबो सिताबो, सिरीयस मॅन, बुलबुल, कामयाब, द पिंक इज स्काय हे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. याशिवाय मराठी चित्रपट बिटरस्वीट आणि डिसाइपलदेखील या शर्यतीत होते.
दरम्यान ‘जल्लीकट्टू’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर 2019 टोरंटो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात झाला होता. त्यानंतर हा चित्रपट 24 व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला होता. ‘जल्लीकट्टू’चे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांना भारतातील 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळाला होता.