इंदुरीकर महाराज म्हणाले…सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा डाव सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :-  कीर्तनाबरोबरच आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे काहींना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केलेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली आहे.

याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांनी नुकतेच एक महत्वाचे प्रतिपादन केले आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा डाव सुरू असून

किर्तनरुपी सेवेतून खरं बोलणं व समाजापुढे वर्तमान काळातली वस्तुस्थिती मांडणे माझ्यासारख्या प्रबोधनकाराला आता चांगलेच महागात पडत असून मला कोणी कितीही बदनाम करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील समाज घडविण्यासाठी व धर्मकार्य पुढे नेण्यासाठी माझे समाज प्रबोधन कार्य सुरूच राहणार आहे.

व्यसनाचे प्रमाण वाढले आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले, यामुळे तरुण वेगळ्या वळणाकडे वळला आहे. देवाच्या मंदिरा इतकेच ज्ञानाच्या मंदिराला महत्त्व द्या तरच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करु शकतो असे म्हणत मी लस घेतली नाही घेणार नाही असं म्हणालो परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटले नाही.

अनावधानाने एखादा शब्द चुकून वाणीतून जातो तोच धागा पकडून टीआरपी वाढवण्यासाठी मला लक्ष केले जात असल्याची खंत इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office