जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सकारात्मक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पूरक सोयीसुविधा उपलब्ध करणे तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई सकारात्मक आहे.

दरम्यान लवकरच ही बैठक मुंबईत घेणार असल्याचे उद्योगमंत्री यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी मधील उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत नगरच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाची उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांची जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी भेट घडवून आणली.

सोनई येथील मुळा शैक्षणिक संस्थेचे आमराई विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या वेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष डॉ. अरविंद पारगावकर यांनी एमआयडीसी प्राधिकरण व ग्रामपंचायतचा दुहेरी कर उद्योजकांना भरावा लागतो.

महावितरणची व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील वीजबिल दरवाढ, अहमदनगर औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण, पर्यावरण रक्षणासाठी रिसायकलिंग क्षेत्रातील उद्योगांना सहकार्य करावे, लघुउद्योगांकरिता फ्लॅटेड रुफशेडसाठी मंजुरी आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

तसेच आमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित १६८ प्लॉटधारकांचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ४० वर्षे जुनी असून तिचे नूतनीकरण करावे,

ईएसआयसीचे नगर येथे कार्यालय सुरू करून कामगारांसाठी ५०० बेडचे हॉस्पिटल उभारावे तसेच एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस चौकी करावी, अशा मागण्या केल्या. एमआयडीसीतील प्रश्नांबाबत उद्योगमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याने उद्योजकांनी मंत्री गडाख यांचे आभार मानले.