Infinix Note 30 5G : 108MP कॅमेरा असणारा ‘हा’ फोन 13,499 रुपयात करा खरेदी, जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Infinix Note 30 5G : अनेकांना शानदार फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. परंतु त्यांना तो जास्त बजेट असल्याने खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही Infinix Note 30 5G हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता.

कंपनीकडून तुम्हाला या फोनवर 25% डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 17,999 रुपये नाही तर 13,499 रुपये झाली आहे. तसेच बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 12,900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix कडून आपल्या या शानदार फोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येत असून त्याची शिखर ब्राइटनेस पातळी 580 nits इतकी आहे.

या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनीने त्यामध्ये NEG ग्लास देखील देण्यात येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा स्मार्टफोन 8 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो. या मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्हाला या फोनची मेमरी 2 टीबीपर्यंत वाढवता येईल.

तर फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 108-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह AI लेन्सचा समावेश केला आहे. तर त्याच वेळी, कंपनीने या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला असून साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची ही बॅटरी 45 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतकेच नाही तर ड्युअल नॅनो सिम सपोर्ट असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय पाहायला मिळू शकतात. IP53 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टंट रेटिंग असणारा हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित XOS 13 वर काम करेल. हा फोन सनसेट गोल्ड, मॅजिक ब्लॅक आणि इंटरस्टेलर ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.