महागाईचा भडका… आक्रमक राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  गेल्या काही दिवसांसपासून कोरोनामुळे आधीच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

या संकटातून बाहेर काढायचे तर बाजूलाच राहिले मात्र यावर नागरिकांवर महागाईचा मारा केला जातो आहे.

यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या वतीने आज केंद्राच्या या महागाई विरोधात निर्दर्शने केली. आज नेवासा तालुक्यातील भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे नेतृत्वाखाली हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका उपस्थितांनी केली. केंद्राच्या चुकीचा धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते आहे.

या महागाईच्या निषेधार्थ नेवासा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. यावेळी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, मंडल अधिकारी आय्यप्पा फुलमाळी, तलाठी विजय जाधव यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24