ताज्या बातम्या

महागाईचा भडका ! सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आता नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस, पीएनजी), सीएनजीच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असून आता दिल्लीत सीएनजीचा दर 49.76 रुपये प्रति किलो असेल. ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत आणि उपनगर शहरांत 54.57 रुपये प्रति किलो दर आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून सीएनजी 49.76 रुपये प्रति किलो उपलब्ध होईल. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत सीएनजीची किंमत 49.76 रुपये प्रति किलो असेल असे कंपनीने ट्विट केले आहे.

12 दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी, सीएनजी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 56.02 रुपये आणि गुरुग्राममध्ये 58.20 रुपये प्रति किलोवर उपलब्ध होईल.

मुझफ्फरनगरमध्ये सीएनजीची किंमत 63.28 रुपये प्रति किलो आहे, तर शामली, मेरठमध्ये सीएनजीची किंमत 63.28 रुपये प्रति किलो आहे.

कानपूर, फतेहपूर येथे सीएनजीची किंमत 66.54 रुपये प्रति किलो आहे. त्याचबरोबर हमीरपूरमध्ये सीएनजीची किंमत 66.54 रुपये प्रति किलो आहे.

Ahmednagarlive24 Office