महागाईचा भडका ! पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- पेट्रोलच्या किंमती आज पुन्हा एकदा वाढ झाली असून पेट्रोलची आगेकुच आता ९४ रुपयांपर्यंत गेली आहे. आज पेट्रोलच्या दरात पुन्हा २९ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल आता ९३.७७ रुपये लिटर इतकी झाली आहे.

त्याचवेळी डिझेलमध्ये लिटरमागे २६ पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर लीटरमागे ९४.१२ रुपये आणि डिझेलचा दर लीटरमागे ८४.६३ रुपये झाला.

मुंबईत पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत पेट्रोल ९० रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज दिल्लीत एक लीटर पेट्रोल ८७.६० रुपये आहे. डिझेलचा भाव ७७.७३ रुपये आहे.

चेन्नईत आजचा पेट्रोलचा दर ८९.९६ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८२.९० रुपये दर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८८.९२ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ८१.३१ रुपये झाला आहे.

बेंगळुरूमध्ये पेट्रोल ९०.५२ रुपये झाला आहे तर डिझेल ८२.९० रुपये झाला आहे. इंधनदरात होणारी वाढ पाहता मुंबईत लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

देशभरातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीजवळ पोहोचले आहेत. गेल्या १० महिन्यांत पेट्रोलचे दर तब्बल १८ रुपयांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24