LPG Cylinder : लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार असून आर्थिक वर्ष 2022 मध्ये महागाईमुळे सर्वासामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना नवीन वर्षात दिलासा मिळणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅसच्या किमती कमी करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.
जर तुम्हीही पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे वैतागला असाल, तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार असून या वर्षात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात, असे मानले जात आहे.
या वर्षी म्हणजे जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 30 टक्क्यांपर्यंत घसरण होत असल्याचे दिसत आहे. देशात तेव्हापासून एलपीजी सिलेंडरची किंमत 1,056 रुपये इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे नवीन वर्षात एलपीजी सिलिंडरवर मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे ठरेल.
बदलने नाही सिलेंडरचे दर
देशात इंधनाचे उत्पादन कमी असल्यामुळे परदेशांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील मंदीमुळे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील काही वर्षांपासून असे दिसून येत आहे.
तेलाच्या किमती ठरवण्याचे अधिकार सरकारी कंपन्यांना आहेत. या कंपन्यांनी 6 जुलै 2022 पासून एलपीजीच्या किमतीत काहीच बदल केलेला नाही. आता कच्च्या गॅस इंधनाच्या किमतीत 30 टक्क्यांनी घट झाली असून आता या किमतीत घट होण्याची शक्यताआहे.
स्वस्तात मिळू शकतो सिलिंडर
जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत ऑक्टोबर 2022 मध्ये प्रति बॅरल $ 85 इतकी असल्यामुळे LPG सिलेंडर 899 रुपयांना मिळत होता. तेव्हापासून ते आतापर्यंत सरकारने हे दर एकूण दीडशे रुपयांनी वाढवले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर आता प्रति बॅरल $ 83 पर्यंत खाली घसरले आहे. देशात नवीन वर्षात सामान्य गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.