अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- एप्रिल महिन्यापासून कंपन्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. मारूती सुझुकी इंडियानंतर आता वाहन उत्पादक कंपनी निसान देखील आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे.
जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान इंडियानं मंगळवारी अन्य उत्पादनांच्या किंमती वाढल्यामुळे कारच्या किंमती वाढवल्या जाणार असल्याची माहिती दिली.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२१ पासून Nissan आणि Datsun च्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत.
परंतु सध्या या किंमती किती वाढवल्या जातील याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.ऑटो पार्ट्सच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं किंमती न वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु आता कंपनी सर्व Nissan आणि Datsun च्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे,
असं कंपनीकडून सांगण्यात आलं. एप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत.
या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या.