अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक शिवारात एकाने दुसऱ्या व्यक्तीस डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी एकाजणाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, परेश माधव मुळे (रा. धांदरफळ बुद्रूक) हा त्याच्या घरासमोर त्याचा मित्र भाऊसाहेब संपत कानवडे याच्यासह उभा होता.
त्यावेळी अमेय माधव मुळे हा तेथे आला व त्याने कानवडे याची मोटारसायकल लोखंडी रॉडच्या सहाय्याने फोडली.
यावेळी परेश मुळे याने अमेय मुळे यास विचारले की, तु माझ्या मित्राची गाडी का फोडत आहेस, त्यावर अमेय मुळे याने परेश यास म्हणाला, तु मध्ये का आलास, तु माझे दारु व्यवसायाची माहिती पोलिसांना का देतो, आता तुझा काटा काढतो,
असे म्हणत त्याच्या हातातील लोखंडी रॉडने परेश मुळे यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात रॉड मारुन जबर जखमी केले. याबाबत परेश मुळे याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अमेय मुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.