रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळ व विविध प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक घेणार – अविनाश घुले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सभासद नोंदणी करुन भिंगार विभागच्या रिक्षांवर संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांच्या हस्ते स्टिकर लावण्यात आले यावेली संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन,

भैरू कोतकर, सचिव अशोक औषिकर, सहसचिव लतीफ शेख, बाबा भाई, सोपान दळवी, अशोक खेतमाळस, सतिष गोंधळी, साईराज पिल्ले, असद सय्यद, अजीम शेख, इलाही पैलवान, महमूद शेख आदीसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सभासद नोंदणी व संघटनेचे स्टिकर रिक्षाला लावण्यात आले व संघटनेच्या माध्यमाने रिक्षाचालकांच्या अनेक विविध अडचणी प्रश्न सोडविण्यात येणार आहेत व कल्याणकारी मंडळाची लवकरात लवकर मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येणार

असल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांनी व्यक्त केले तसेच नगर शहरात पालकमंत्र्यांचा जेव्हापण दौरा असेल तेव्हा संघटनेच्या माध्यमाने रिक्षा चालकांच्या विविध अडचणी संदर्भात बैठक घेण्यात येणार असून

लवकरात लवकर संघटनेचे विविध प्रश्न मार्गी लावणार व रिक्षाचालकांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संघटना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे घुले म्हणाले.

Ahmednagarlive24 Office