इंजेक्शनची हेराफेरी; साईबाबा रुग्णालयाची वाताहात सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढला आहे. यामुळे दरदिवशी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यात प्रशासन देखील अपयशी ठरत आहे.

यातच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनवरून सध्या जिल्ह्यात गदारोळ सुरु आहे. यातच जिल्ह्यात रेमडेसिविर वितरणात शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला, तसेच राहात्यावर वारंवार अन्याय होत असल्याची येथील नागरिकांची भावना आहे.

२२ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या यादीत शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयाला केवळ तीन रेमडेसिविर तर खासगीसह एकूण अकरा इंजेक्शन मिळाले.

दरम्यान यादीनुसार आज नगरला साडेसहाशेपेक्षा अधिक तर संगमनेरला जवळपास ११६, श्रीरामपूर- ६३, पारनेर- ३३, राहुरी-१०, कोपरगाव-२३, अकोले-८, जामखेड-६, पाथर्डी-४, शेवगाव-५, श्रीगोंदा-९ असे इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.

शिर्डीसाठी देण्यात आलेले इंजेक्शन कोपरगाव येथील एका एजन्सीच्या नावावर आले. मात्र, साईबाबा रुग्णालयासाठी संस्थानमधील मेडिकलच्या माध्यमातून संबंधित एजन्सीकडे विचारणा करता, इंजेक्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

यादीत नाव आहे, तर इंजेक्शन गेले कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे या इंजेक्शनची हेराफेरी सुरु असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान लवकरात लवकर या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यात येऊन याची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24