अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीच्या पात्रातून बेसुमार विनापरवाना पोयटा वाहतूक सुरु आहे. कुठलीही परवानगी नसताना जेसीबी, पोकलॅन्ड तसेच ट्रॅकटर, ट्रकच्या साहाय्याने वीट भट्टीसाठी गौणखनिज पोयटा मातीचा बेसुमार उपसा सुरु आहे.
एकीकडे एवढं सगळं सुरु असताना महसूल यंत्रणेने आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. यामुळे गावातले सर्वसामान्य नागरिक मात्र या वाहनाच्या वर्दळीमुळे त्रस्त झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यात माठ गावच्या हद्दीत घोड नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणत वाळु आणि वीट भट्टी साठी लागणार पोयटा माती आहे.
सध्या नदीच्या पात्रातील पाणी आटले असल्याने या भागात असणाऱ्या शेकडो वीट भट्टी चालकांनी या नदीच्या पात्रातून विनापरवाना महसूल बुडवून मातीचा उपसा सुरु केला आहे.
मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या साहाय्याने गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरु आहे. महसूल यंत्रणा याबाबत कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने गावातील अनेक नागरिक या सर्व प्रकारामुळे त्रस्त झाली आहे.
रात्र-दिवस या मातीचा, वाळूचा उपसा होत असल्याने या बाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.