अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- दुष्काळी भागाला पिण्याच्या पाणी योजनेतुन न्याय देण्याचे काम करु. आधी राहुरी – नगर-पाथर्डी मतदार संघातील पाणी योजना मार्गी लावुन मग जिल्ह्यातील पाणी योजनासाठी आग्रह धरु. मी प्रथम आमदार आहे व मग मंत्री आहे असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
येथील पंचायत समितीत आयोजित मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, मिरी-तिसगाव योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे राज्याचे सदस्य सचिव ओमराजे निंबाळकर यांना सांगुन प्रकल्प संचालक सल्लागार यांची नेमणुक केली आहे.
योजनेतील काही गावे पाणी घेत नाहीत. आणि काही नवीन गावांची पाण्याची मागणी वाढली आहे. पहील्या ज्या गावांना पाण्याची गरज नाही असे गावे वगळुन नवीन गावांचा समावेश करता यईल का याची चाचपणी सुरु आहे. योजनेतील अडचणी दुर करुन नवीन काय करता येईल यासाठी सर्वेक्षण व आराखडे तयार करण्याचे काम तातडीने करण्यात येईल.
तसेच मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या पाण्याची चोरी करणाऱ्यांचा शोध आता मशीनव्दारे घेण्यात येणार आहे. पाणी चोरावर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जाणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी पथक अचानक धाडी टाकुन कडक करावाई करील.