प्रेरणादायी ! वयाच्या 16 व्या वर्षी सुरु केले बाइसिकल कस्टमाइजेशनचे काम , 18 व्या वर्षी कंपनीची स्थापना अन 21 व्या वर्षी 40 लाखांचा टर्नओवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-आजची कहाणी भोपाळमध्ये राहणार्‍या निखिल जाधव यांची आहे. वयाच्या 21 व्या वर्षी ते ‘बाइकर्स प्राइड’ नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

त्यांची कंपनी इलेक्ट्रिक आणि कस्टमाइज बाइसिकल बनवते. वर्ष 2018 मध्ये सुरू झालेल्या कंपनीची नेटवर्थ 1 कोटी 10 लाख रुपये आहे आणि गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल 40 लाख रुपये होती. निखिल स्वत: क्रॉस कंट्री सायकलपटूही होता.

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी मुंबई-पुणे-मुंबई आणि मुंबई ते गोवा असा 1000 कि.मी.चा प्रवास सायकलवरून अवघ्या पाच दिवसात पूर्ण केला. गेल्या तीन वर्षात त्यांनी 300 हून अधिक इलेक्ट्रिक सायकली बनवल्या आहेत. याशिवाय त्याच्या देशभरात दीडशे डिलरशिप आहेत, जिथे त्यांच्या इलेक्ट्रिक बाइसिकल सेल होतात.

निखिल सांगतात , ”सुरुवातीला मी माझ्यासाठी एक बाइसिकल तयार केली, लोकांना ते आवडले आणि बाकीचे सायकलस्वार आणि नंतर मित्रांसाठी बनवले. लोकांना माझे काम खूप आवडले. माझा छंद कधी पॅशन व नंतर व्यवसायात बदलला हे मलाच कळले नाही.

निखिलने कॉमर्स मधून 12 वी पास केली, त्यानंतर बीबीएमध्ये प्रवेश घेतला, परंतु बिझनेससाठी त्याला दुसऱ्या वर्षी कॉलेज सोडावे लागले. तो म्हणतो, ‘मी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता कारण ज्यायोगे मी व्यवसायाची बारकावे शिकू शकेन, परंतु त्या दरम्यान मला कस्टमाइज बाइसिकलची बल्क ऑर्डर मिळाली,

म्हणून माझ्या समोर महाविद्यालय आणि व्यवसाय यापैकी एक निवडण्याचा पर्याय होता आणि मी व्यवसाय निवडला. कारण हे माझे फाइनल डेस्टिनेशन होते. ‘ निखिल सांगतात की, ‘2016 मध्ये आम्ही पहिले मॉडेल बनवले होते, त्यानंतर तीन वर्षांच्या अनुसंधान व विकासानंतर आम्ही आपले पहिले प्रॉडक्ट बाजारात आणले,

आज आमचे सुपर प्रीमियम उत्पादन 80 हजार रुपयांचे आहे. एकेकाळी असे म्हटले जात होते की 5 हजाराहून अधिक किंमतीची सायकल कोण घेईल? पण गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड बदलला आहे. निखिल म्हणतो की, ‘माझ्यासाठी माझ्या आजी ही सर्वात मोठी प्रेरणा आहे.

लहानपणापासूनच मी प्रत्येक खेळणी उघडायचो आणि ते कसे कार्य करते ते पहायचो . यामुळे माझ्या वडिलांना राग यायचा पण आजी म्हणायची की काहीतरी शिकतोय , जाऊदे. तिने मला नेहमीच साथ दिली. त्याच वेळी, जेव्हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला तेव्हा संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दर्शविला, मला कोणीही अभ्यास पूर्ण करण्यास भाग पाडले नाही.

निखिलच्या स्टार्टअपमध्ये आज 9 लोकांची टीम कार्यरत आहे. जेव्हा तो साइकिलिस्ट होता तेव्हा तो सुमारे दोन हजार साइकिलिस्ट ग्रुपशी कनेक्टड होता आणि त्याच्यासाठी बाइसिकल कस्टमाइजेशन चे काम करत असे.

तेथून त्याने मिळवलेल्या पैशांनी वर्ष 2018 मध्ये सुमारे एक लाख रुपये खर्चून स्टार्टअपला सुरुवात केली. आणि आता त्याच्या कंपनीने चांगलेच मोठे स्वरूप घेतले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24