गणेशोत्सवकाळात बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने जपलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी -आमदार संग्राम जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  गणेशोत्सवकाळात बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने (ट्रस्ट) जपलेली सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी आहे. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना गणेशोत्सव काळात घेतलेले उपक्रम वाखण्याजोगे असतात. कोरोनाकाळात प्रतिष्ठाणने वंचित घटकांना मदत देण्याचे कार्य केले.

तर गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला. संपुर्ण शहरात गोर-गरीब घटकांसाठी आधार ठरलेल्या व कोणत्याही संकटकाळात गरजूंसाठी मदत घेऊन पोहचणार्‍या घर घर लंगर सेवेच्या कार्याचा गौरव करुन सामाजिक कार्य करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

गणेशोत्सवनिमित्त बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाण (ट्रस्ट) च्या वतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती आमदार जगताप यांच्या हस्ते करुन, घर घर लंगर सेवेच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी उपमहापौर दीपक सुळ, प्रतिष्ठाणचे संस्थापक दिलदारसिंग बीर, अजय दराडे, किरण डफळ, विकी मेहेरा, किशोर लगडे, वरुण मिस्किन,

बबलू राजपूत, ज्येष्ठ नागरिक सुरेश म्याना, शरद क्यादर, बाळासाहेब गोफणे, रामदास शेरकर, प्रताप धुमाळ, सारंग पंधाडे, सुरज जाधव, अक्षय डाके, बंटी परदेशी, आकाश दिघे, गणेश दराडे, नरेश चव्हाण, विक्रम पाठक, पिटू गोधडे, कैलास शिंदे, भुपेंद्र रासने, गजेंद्र सैंदर,

मोहन गुंजाळ आदिंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी आमदार जगताप यांच्या हस्ते मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. कोरोनाच्या संकटकाळात गोर-गरीब व गरजू घटकांना दोन वेळचे जेवण देऊन निशुल्क कोविड सेंटर चालविल्याबद्दल, तसेच पूरग्रस्तांना मदत उपलब्ध करुन दिल्याबद्दल घर घर लंगर सेवेचे सेवादार हरजितसिंह वधवा, राहुल बजाज, अनिश आहुजा,

कैलाश नवलानी यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला. हरजितसिंह वधवा यांनी गणेश उत्सव काळात अनेक युवक कार्यकर्ते एकत्र येऊन सामाजिक उपक्रम घेत असतात. बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, सामाजिक कार्यात त्यांचे देखील मोठे योगदान असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मंडळाचे विनायक सोन्नीस, विनोद तुमनपेल्ली, सुमित गोसके, रोहित म्याना, गणेश चट्टेपेल्ली, सोमनाथ लगडे, जस्मित राजपूत, योगेश विद्ये, योगेश राऊत, अंबादास डफळ, प्रितेश डफळ, प्रथमेश संभार आदी युवक उपस्थित होते.