बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे स्थलांतर करण्याच्या सूचना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी शहरातील रस्ते विकसित व इमारतीचे नूतनीकरण याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आशा टॉकीज चौकातील कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्याचे स्थलांतरित करण्यासाठी जी चर्चा झाली. या दवाखान्यासाठी सुमारे १९ कोटी निधी मंजूर असून आशा टॉकीज चौकामध्ये रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी बाळासाहेब देशपांडे दवाखाना भोसले आखाड्यातील मनपा प्रभाग क्रमांक चार समितीच्या जागेवर भव्य दिव्य अशी इमारत उभी करण्यात यावी.

त्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले व स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी दिले. यावेळी आयुक्त शंकर गोरे, महिला बालकल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा, माजी नगरसेवक निखिल वारे उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office