अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-भविष्य निर्वाह निधीसह अन्य अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीवरील व्याजात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं मागे घेतला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यामुळे आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी सलग तीन तिमाहीत सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवले होते.
मात्र, आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी सुधारीत दरांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली होती.
मात्र, हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अल्पबचत योजनांवरील व्याजदर २०२०-२१ या आर्थिक वर्षीच्या अखेरच्या तिमाहीतील दरांइतकेच असतील, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.