Interest Rates : SBI ने केला कर्जाच्या व्याजदरात बदल! फायदा होणार की तोटा? जाणून घ्या

Pragati
Published:
Interest Rates

Interest Rates : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांची संख्यादेखील खूप जास्त असते.

जर तुम्ही देखील या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता या बँकेने MCLR मध्ये बदल केला आहे. हे दर 15 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. ज्याचा परिणाम बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे. कसे ते जाणून घ्या सविस्तर.

खरंतर SBI बँकेच्या MCLR मध्ये बदल झाल्यानंतर काही कालावधीसाठी व्याजदरात वाढ झाली आहे. तसेच, या बँकेकडून सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी अनेक सवलती देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, MCLR आधारित दर आता 8 ते 8.75 टक्क्यांच्या दरम्यान असून रात्रीचा MCLR 8 टक्के इतका आहे. एक महिना आणि तीन महिन्यांचा दर 8.15 टक्के, तर सहा महिन्यांसाठी MCLR 8.45 टक्के या बँकेकडून निश्चित करण्यात आला आहे. यासह, एका वर्षासाठी MCLR 8.55%, दोन वर्षांसाठी 8.65% आणि तीन वर्षांसाठी 8.75% इतका निश्चित झाला आहे.

दरम्यान, सणासुदीच्या काळात बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, SBI होम लोनवर 65 बेसिस पॉइंट्स (BPS) पर्यंत सूट देऊन विशेष मोहीम देखील राबवली जात आहे. हे लक्षात घ्या की ही सवलत फक्त नियमित गृहकर्ज, फ्लेक्सिपे, होम, एनआरआय, पगार नसलेल्यांवर लागू असेल. बँकेने जाहीर केल्यानुसार, आपल्या ग्राहकांना केवळ 31 डिसेंबर 2023 पर्यंत गृहकर्जावर ही सवलत मिळणार आहे. या काळातही ग्राहक या सवलतीचा लाभ घेऊ शकतील.

इतकेच नाही तर ही बँक आपल्या ग्राहकांना होम लोन आणि टॉप अप लोनच्या प्रोसेसिंग फीमध्ये 50 टक्के सवलत देखील देत ​​आहे. तर बँक संपादन, विक्री आणि हस्तांतरणासाठी तयार असणाऱ्या घरांसाठी प्रक्रिया शुल्कावर 100 टक्के सवलत देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe