अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-वैदू समाजातील कृष्णा शिंदे (२१) हा तरुण आंतरजातीय विवाह करत असल्याने समाजाच्या जात पंचायतीने त्याला जातीबाहेर टाकल्याचा दावा या तरुणाने केला.
जातपंचायतीचा कुटुंबीयांवर दबाव असल्याचेही या तरुणाने सांगितले. दरम्यान, याबाबत पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.
नऊ महिन्यापासून हा तरुण आई-वडिलांचे घर सोडून वेगळा रहात आहे. आई- वडिलांवर दबाव येत असल्याने तेही त्याला घरात घेत नाहीत.
उलट तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत असल्याचे कुटुंबीय सांगतात अशी कृष्णाची कैफियत आहे. या मुली सोबत कृष्णा वेगळ्या ठिकाणी राहत असला तरी आपण केवळ तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे.
आपल्याला अद्याप अधिकृत लग्न करायचे असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. सिन्नर, म्हसरुळ येथील समाजातील पंचायतीचे काम पाहणारे प्रमुख दबाव टाकत असल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.