अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- आमच्या पोटात दारू तर आम्ही कोणालाही मारू अशी म्हण एका दारुड्याने सत्यतेत उतरवली आहे.
दारूच्या नशेत तर्राट झालेल्या एका दारुड्याने चक्क अधिकाऱ्यालाच चोप दिला असल्याची घटना कर्जात तालुक्यात घडली आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामविकास अधिकाऱ्यास एकाने दारूच्या धुंधीत उतारा मागण्याच्या कारणावरून कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी सदर आरोपीस तातडीने ताब्यात घेतले आहे.
संजय मद्रास काळे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संजय काळेने ग्रामविकास अधिकारी एम.एस. माने यांना कार्यालयात घुसून मारहाण केली आहे. त्यांच्या अंगावरील कपडे फाडले व सरकारी दप्तर अस्ताव्यस्त केले.
कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण करून उपस्थित ग्रामस्थांना शिवीगाळ केली. तसेच आरोपीने फर्निचर अस्ताव्यस्त फेकून दिले.
कार्यालयात धिंगाणा घालत शिवीगाळ केली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहे.