दारूच्या नशेने केला घात ,दोघा भावांना खावी लागली जेलची हवा..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राञीचे सात वाजलेले पोलीसांच्या हजेरीची वेळ झालेली. इतक्यात दोन महाभाग दारुच्या नशेत तुर्र झालेले. ठाणे अंमलदाराच्या दालनात शिरतात ठाणे अंमलदाराच्या दालनात मोठ मोठ्याने आरडाओरड करुन पोलीस ठाणे डोक्यावर घेतले.

आमची फिर्याद घ्या, नाहीतर आम्ही दोघे विषारी औषध पिऊ अशी दमबाजी करु लागले. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेवून थोडासा प्रसाद खाऊ घातला.दारूची नशा पडली महागात पडली; पण त्यास उशीर झाला होता. कारण दारुच्या नशेने केव्हाच घात केला होता…..

अखेर जेलची हवा खावी लागली…! बुधवारी राञी सात वाजण्याच्या सुमारास पोलीसांची हजेरी राञीच्या ड्युट्या जाणून घेण्यात व्यस्त असताना.दोन तरुन दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात शिरले. ठाणे अंमलदारांच्या दालनात मोक्कार आरडाओरड करुन, अवघे पोलीस ठाणे डोक्यावर घेतले.

आमची फिर्याद घ्या कोणा विरुद्ध फिर्याद द्यायची ठाणेअंमलदाराने विचारले असता माहित नाही. या दोघां नी दारुच्या नशेत पोलीस ठाणे डोक्यावर घेवून मोठ्याने आरडाओरड सुरुच ठेवली. काही पोलीसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू नशेत तुर्र असलेले हे तरुण समजुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच.

पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले थोडाफार प्रसाद खाऊ घातला.एवढ्यात, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. आरडाओरड ऐकून दोघांना केबिनमध्ये बोलविले. त्यांचा अवतार पाहून समजायचे ते समजले. दोघांची उचलबांगडी करून, वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.

राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला आल्यावर त्यांची नशा उतरली. त्यांनी पोलिसांना गयावया केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांचा दाखला घेऊन, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

अखेर दोघांचा दारूच्या नशेने घात केला.दोघांनाही जेलची हवा खावी लागली. तुकाराम रामकृष्ण राजदेव (वय ३५), संदीप नामदेव राजदेव (वय ३०, दोघेही रा. ब्राम्हणी) अशी अटक केलेल्या दारुड्यांची नावे आहेत. दोघेही चुलत भाऊ. दोघांनी भरपूर दारु ढोसली. नशेचा अंमल चढला.

तशी त्यांच्या अंगात वीरश्री चढली. स्वतःच्या पायावर नीट उभे राहता येईना. तरी, त्यांनी धीटाईने राहुरी पोलीस ठाणे गाठले.पोलीस ठाण्याच्या आवारात शिरताच अंगात संचार भरला पोलीसांच्या नावे लाखोळी उधाळयास सुरवात केली. दोघे ही ठाणे अंमलदारासमोर उभे ढाकले.

परंतू नीटसे उभे राहता येत नसतानाही आवाजात माञ रुबाब दाखवला जात होता.आमची तक्रार घ्या. असा आग्रह धरला. तक्रार काय आहे. असे विचारल्यावर त्यांनी “आम्ही दारू पिऊन पडलो. आमची तक्रार नोंदवा.” असा घोशा लावला. “कुणा विरुद्ध तक्रार द्यायची.” असे ठाणे अंमलदारांनी विचारल्यावर “ते आम्हाला माहिती नाही.

तुमचीच तक्रार नोंदवा. नाहीतर विषारी औषध पिऊ.” अशी दमबाजी सुरू केली. पोलीस विनवण्या करून, त्यांना निघून जाण्यास सांगू लागले. तसा त्यांचा पारा चढला. आवाज वाढला. आरडाओरड करुन, त्यांनी पोलिस ठाणे डोक्यावर घेतले. राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला आल्यावर त्यांची नशा उतरली.

त्यांनी पोलिसांना गयावया केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांचा दाखला घेऊन, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अखेर दोघांचा दारूच्या नशेने घात केला.दोघांनाही जेलची हवा खावी लागली.त्यावेळी त्यांची नशा खाडकन उतरली. गयावया सुरु झाल्या. पण उशीर झाला होता. कारण दारुच्या नशेने केव्हाच घात केला होता…..

अहमदनगर लाईव्ह 24